चंद्रकांत पाटलांची ‘साठी बुद्धी नाठी

चंद्रकांत पाटलांची ‘साठी बुद्धी नाठी

मुंबई: चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘युवा वॉरियर्स’ अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना भाजप मुस्लिमविरोधी असल्याच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले. त्या ओघातच त्यांनी अब्दुल कलाम यांच्याबाबत चुकीची माहिती दिली. एपीजे अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती केले, असा दावा केला. यावर काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्यावतीने त्यांचा चांगलाच समाचार घेतला हे पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे. त्यांनी ‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण सार्थक करून दाखवली आहे, असा टोला काॅंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला.

प्रवक्ते अतुल लोंढे यांनी समाचार घेतला. वाजपेयी यांनी गोध्रा दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करण्याचा आदेश दिला होता, पण तो न पाळता त्यांनी मूठभर लोकांसाठी काम केले. कलाम यांनी देशाला २०२० मध्ये जागतिक महासत्ता करण्याचे स्वप्न दाखवून एक कार्यक्रमही दिला होता पण नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विचारांनाच तिलांजली दिली. कोणत्याही गोष्टीचे श्रेय नरेंद्र मोदींना देण्याचा भाजपा नेत्यांचा आटापीटा असतो तेच पाटील यांनी केले पण वस्तुस्थिती लोकांना माहिती आहे, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ‘अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय त्यावेळी एकमताने झाला होता. त्या निर्णयात नरेंद्र मोदी यांचा कोणताही सहभाग नव्हता. उलट त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे मोदींना राजधर्माचा धडा शिकवत होते’, अशा शब्दांत राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना फटकारले.

म्हणाले.

COMMENTS