पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू अनधिकृत बांधकामाप्रकरणी वादात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू अनधिकृत बांधकामाप्रकरणी वादात

अहमदाबाद- ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी हे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अडचणीत सापडले आहेत. अहमदाबाद महापालिकेने त्यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तात्काळ अनधिकृत बांधकाम थांबवण्यास सांगितले आहे.मात्र 2वेळेस नोटीस बजावून सुद्धा प्रल्हाद मोदी यांनी बांधकाम थांबवलं नाही.

अहमदाबाद येथील रबरी कॉलनी येथील त्यांच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) दुकानासमोर अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. हे बांधकाम रोखण्यासाठी त्यांना यापूर्वी दोनदा नोटीस बजावली असताना सुद्धा त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले. त्यामुळे त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे. ही तिसरी नोटीस असल्याने यानंतरही अनधिकृत बांधकाम सुरूच राहिल्यास ते पाडावे लागेल, असं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रल्हाद मोदी सध्या छत्तीसगडमध्ये असून नोटीस बजावल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे.

COMMENTS