महाराष्ट्रातील 16 हजार गावे दुष्काळमुक्त – पंतप्रधान

महाराष्ट्रातील 16 हजार गावे दुष्काळमुक्त – पंतप्रधान

शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीमध्ये आले होते. प्रंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हस्ते आज चाव्या देण्यात आल्या. प्रातिनिधीक स्वरुपात 10 लाभार्थींना चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना मोदी यांनी यूपीए सरकरावर हल्लाबोल केला. यूपीएच्या कार्यकाळातील 4 वर्षात गरिंबासाठी फक्त 25 लाख घरे बांधण्यात आली. तर भाजप सरकारच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात 1 कोटी 25 लाख घरे बांधण्यात आली असा दावा मोदींनी केलाय.

महाराष्ट्रातील दुष्काळाचा उल्लेख करत महाराष्ट्राला सर्वोतपरी मदत करु असं आश्वासन दिलं. अर्थात शेतक-यांसाठी कोणतीही मोठी घोषणा केली नाही. पिक विमा योजनेचा फायदा शेतक-यांना देऊ असं आश्वासनं दिलं. राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना मदत करेल. त्यात केंद्र सरकारही खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राला मदत करेल असंही आश्वासन मोदींनी दिलं. त्यामुळे दुष्काळाबाबत राज्यातील शेतक-यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 31 तारखेपर्यतची वाट पाहवी लागणार आहे.

जलयुक्त शिवार कामाचं मोदींनी तोडंभरुन कौतुक केलं. जलयुक्त शिवार या योजनेमुळे महाराष्ट्रातील 16 हजार गावे ही दुष्काळमुक्त झाल्याचा दावाही मोदी यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे 42 हजार गावे आहेत. मोदींच्या दाव्यानुसार सुमारे 40 टक्के ग्रामिण महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त आहे. ग्रामिण महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिल्यानंतर या द्यावात तथ्य वाटत नाही.  महाराष्ट्र सरकार या 16 हजार गावांची यादी जाहीर करेल का ? तसं केलं तर मोदीच्या या दाव्यात किती तथ्य आहे ते तपासता येईल.

COMMENTS