भुजबळांच्या सुटेकसाठी पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधीपक्षही रस्त्यावर, नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने !

भुजबळांच्या सुटेकसाठी पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधीपक्षही रस्त्यावर, नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने !

नृपाली देशपांडे, नाशिक

नाशिक –  मनी लँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ‘ईडी’ न्यायालयाकडून जामीन मिळत नसल्याने नाशिकसह राज्यभरात भुजबळ समर्थकांकडून निदर्शने करण्यात आली. भुजबळांची सुटका करा, अशा मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले.

येवल्यात भुजबळ समर्थकांकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले,. निफाडमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले, कळवणमध्ये छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी व त्यांची सुटका करावी या मागणीचे निवेदन कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भुजबळांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याचबरोबर एकेकाळचे भुजबळ यांचे विरोधक आणि भाजप नेते आमदार अपूर्व हिरे हेही आंदोलनात सहभागी झाल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात नवी समिकरणे उदयाला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांप्रमाणेच भुजबळांचे पक्षांतर्गत समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनाच्या निमित्ताने अनेक दिवसांनी एकत्र दिसले. माजी खासदार देविदास पिंगळे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार आदींसह आ. जयवंत जाधव, समता परिषदेचे दिलीप खैरे, विजयश्री चुंभळे, अर्जुन टिळे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

COMMENTS