नाशिकमधील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, धक्कादाय माहिती समोर !

नाशिकमधील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, धक्कादाय माहिती समोर !

नाशिक  काही दिवसांपूर्वीच शहरातील भाजप नगरसेवकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. ही तोडफोड विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केली असल्याचा अंदाज मांडण्यात आला होता. परंतु पोलिसांच्या तपासानंतर भाजप पदाधिकाऱ्यानंच या गाड्या फोडल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकारी सुनिल खोडे यांना नाशिकमधील इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप पदाधिकारी आणि विद्यमान नगरसेविका सुप्रिया खोडे यांचे ते  पती आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजप नगरसेवक सतीश सोनवणे आणि नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. पाच एप्रिलच्या मध्यरात्री झालेल्या तोडफोड प्रकरणी आठवड्याभरानंतर पोलिसांनी खोडे यांना अटक केली आहे. विकासकामांच्या श्रेयवादावरुन हा सर्व प्रकार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून यामुळे भाजपची अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.

COMMENTS