नाशिक – स्मार्टसिटी योजनेच्या यादीत नाशिक शहराचा समावेश करण्यात आला. या शहराला स्मार्टसिटी बनविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. परंतु या स्मार्टसिटी शहराचा नुसताच गाजावाजाच दिसत आहे. स्मार्टसिटीच्या नावाखाली असंख्य कामे केवळ कागदावरच दाखविली जात असल्यामुळे या शहराचं अस्तित्वच धोक्यात येत असल्याचं दिसत आहे.
शहरातील चिल्ड्रन पार्क, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण, वनौषधी उद्याान आदी कामं यापूर्वीच झाली आहेत.काळानुरूप माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्मार्टसिटीत प्रकल्प साकारत असताना ‘आयटी’ संबंधित प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १२० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच नाशिकच्या प्रमुख मार्गांवर आजही पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच बेशिस्त रिक्षाचालक दिसत आहेत.
तसेच महापालिका व पोलिसांतर्फे शहरात येत्या काळात तीन हजारांहून अधिक सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. त्याव्यतीरीक्तही ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, स्मार्ट पार्किंग यांचाही त्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतीक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या महाकवी कालिदास कलामंदीर, महात्मा फुले कलादालन आदींचे नूतनीकरण व शहराच्या मध्यवर्ती अशा नेहरु उद्याानाचेही नूतनीकरणाचा त्यात समावेश आहे. हे सर्व करतानाच यात बहुतांशी प्रकल्प हे जूनेच असल्याचेही दिसून येत आहे. प्रत्यक्षात यातील किती गोष्टी साध्य होतात हा नाशिककरांना ‘स्मार्ट’ प्रश्न पडत आहे. कारण गेल्या वर्षभरापेक्षा जास्त कालावधी उलटूनही यातील कोणत्याही कामांना म्हणावी तशी गती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्मार्टसिटीचा नुसताच गाजावाजा दिसून येत आहे.
COMMENTS