लखनऊ – बहुजन समाज पार्टीतून निलंबित केलेले उत्तर प्रदेशातील बडे नेते नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सहा महिन्यांपूर्वी बसपातून निलंबित केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय बहुजन मंच नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्याचं काल काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आलं. एक महिन्यापूर्वी सिद्दीकी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळीच त्यांनी सिद्दीकी यांच्या काँग्रेस प्रवेशाला होकार दिला होता. त्याची औपचारिकता काल काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी गुलाम नबी आझाद आणि प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्या उपस्थितीत पार पडला. सिद्दीकी यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील काही माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यापुढे काँग्रसने बसपासोबत आघाडी केली तरी आपल्याला काहीही अडचण असणार नाही असंही सिद्दीकी यांनी स्पष्ट केलं. आता आपल्याला मायावती यांच्याविषयीही कोणतीही नाराजी किंवा तक्रार नसल्याचंही सिद्दी यांनी यावेळी सांगितलं. पत्रकार परिषदेत त्यांनी दोन तीन वेळा काँग्रेस असा उल्लेख करण्याऐवजी बसपा असा उल्लेख केला. त्यामुळे ज्या पक्षात 34 वर्ष काढली ते विसरण्यासाठी 34 मिनिटे तरी लागतील असं सांगितलं. उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजात मोठा पाठिंबा असलेला चेहरा म्हणून नसीमउद्दीन यांची ओळख आहे. बसपामध्ये असताना त्यांना मायावती यांचा उजवा हात म्हणून ओळख होती. त्यांच्यामुळेच बसपाने राज्यात दलितांसोबत मुस्लिमांची मोठी होटबँक उभी केली होती. बुंदेलखंड परिसरात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीपुर्वी मासबेस नेत्यांना पक्षात घ्यायंच ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून सिद्दीकी यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.
COMMENTS