प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केल्याबद्दल नाथरा ग्रामस्थांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार !

प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केल्याबद्दल नाथरा ग्रामस्थांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार !

परळी – लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जन्मभूमी असलेल्या नाथरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केल्याबद्दल येथील ग्रामस्थांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची आज भेट घेवून आभार मानले. नाथरा येथे असलेल्या हेल्थ युनिटचे श्रेणीवर्धन करून याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे अशी येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. खासदार प्रितम मुंडे यांनी यासंदर्भात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्फत आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ यासंदर्भात कार्यवाही करून याठिकाणी आरोग्य केंद्र मंजूर केले. ही मागणी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आज यशःश्री निवासस्थानी पंकजा मुंडे यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला व आभार मानले.

यावेळी बद्रीनाथ मुंडे, फुलचंद मुंडे, डाॅ. दे.घ. मुंडे, श्रीहरी मुंडे, श्रीकांत मुंडे, महादेव मुंडे, नवनाथ मुंडे, जीवन मुंडे, शशिकांत मुंडे, सतीश मुंडे, गोविंद मुंडे, रामेश्वर मुंडे, अरूण मुंडे, वैजनाथ मुंडे, लक्ष्मण मुंडे, बालासाहेब मुंडे, लिंबाजी मुंडे, दिनकर मुंडे, सुधाकर मुंडे, व्यंकट उपाडे, सोमनाथ किरवले, व्यंकट मिसाळ आदींसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS