अहमदनगर – 2019 साली सत्ता परिवर्तन होऊन राष्ट्रवादीचे सरकार येईल आणि अजित पवार प्रमुख असतील, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. ते अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या शाखेच्या उद्घाटनावेळी बोलत होते. अजित पवार प्रमुख असतील म्हणजे ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेला येऊ लागला आहे. पक्षामध्तये अजित पवार हेच राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. मात्र उघडपणे असं पक्षातलं कोणीही बोललं नव्हतं. त्यामुळे 2019 मध्ये राष्ट्रादीचं सरकार आलं तर अजित पवार हेच मुख्यमंत्री असतील याला धनंजय मुंडे यांनी दुजोरा दिला आहे.
COMMENTS