आज राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

आज राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास  राज ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावर जातील. या भेटीत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करणार आहेत.

28 ऑक्टोबरला मुंबईतील मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि इतर कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात सुशांत माळवदे हे जबर जखमी झाले. फेरीवाल्यांविरोधात सुरु असलेल्या मनसेच्या आंदोलनाने आक्रमक रुप धारण केले. याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आज फेरीवाल्यांचा प्रश्न मांडणार आहेत. या  भेटीनंतर राज ठाकरे मनसेची काय भूमिका जाहीर करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

COMMENTS