परभणी –आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. स्वतंत्र निवडणूक लढविण्यापेक्षा सेनेने आत्ताच सरकारमधून बाहेर पडावं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यात सुरु असलेल्या हल्लाबोल यात्रेदरम्यान परभणीमध्ये घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
दरम्यान भाजपसोबत सत्तेत कशाला आहात? एकाबाजुला सत्तेची, मंत्रीपदाची ऊबही हवी आहे आणि दुसर्या बाजुला आम्ही जनतेसोबत असल्याचे दाखवत आहात. त्यामुळे शिवसेनेनं हे दुटप्पी राजकारण सोडवं असं अजिदादांनी म्हटलं आहे. हे फसवणूक करणारं राजकारण असून राज्यातील शेतक-यांची आणि जनतेची दिशाभूल केली जात असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS