विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा ‘हा’ आहे मेगाप्लॅन !

विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा ‘हा’ आहे मेगाप्लॅन !

मुंबई –  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विानसभेसाठी राष्ट्रवादीनं मेगाप्लॅन तयार केला आहे. या विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळेपक्षा जास्त जागा मागण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 2009 साली राष्ट्रवादी पक्षाने 114 विधानसभेच्या जागा लढवल्या होत्या आणि काँग्रेसने 174 जागा लढवल्या होत्या पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी जास्त जागांची मागणी करण्याची शक्यता आहे.

तसेच जो जिंकणारा उमेदवार आहे त्याला ती जागा दिली पाहिजे, असा निष्कर्ष या बैठकीत निघाला. कुणाचे कोणते पारंपरिक मतदारसंघ आहेत हे न पाहता जो उमेदवार मतदारसंघ जिंकेल त्याला प्राधान्य द्यायचं, अशी राष्ट्रवादीची भूमिका असणार आहे.तसेच
विधानसभा निवडणुकीत नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत एकत्र लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. या निवडणुकीत महिला आणि तरुणांना जास्त संधी दिली जाणार असून या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि मनसे फॅक्टर याबद्दलही चर्चा करण्यात आली.

COMMENTS