भाजपला राष्ट्रवादीचा धसका, ‘या’ मतदारसंघातील उमेदवार बदलला!

भाजपला राष्ट्रवादीचा धसका, ‘या’ मतदारसंघातील उमेदवार बदलला!

मुंबई  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु अशातच भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आता आमदार उन्मेष पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याचा धसका घेऊन भाजपनं उमेदवार बदलला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. त्याचबरोबर स्मिता वाघ यांची उमेदवारी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या अंतर्गत कलहामुळे कापल्याचं सांगण्यात येत आहे.
तसेच विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांच्या बंडांचा फटकाही भाजपला बसण्याची शक्यता आहे. या सर्व बाजूंचा विचार करता उन्मेष पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिली असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS