1 आणि 5 तारखेला भाजपमध्ये मेगाभरती, हे दिग्गज नेते करणार भाजपात प्रवेश?

1 आणि 5 तारखेला भाजपमध्ये मेगाभरती, हे दिग्गज नेते करणार भाजपात प्रवेश?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपची शेवटची मेगाभरती 1 सप्टेंबरला सोलापूरात आणि 5 सप्टेंबरला मुंबईत पार पडणार आहे. यावेळी दिग्गज नेते भाजपात जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या पक्ष प्रवेश सोहळ्याला भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान 1 सप्टेंबरला सोलापूर येथे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रावादीचे माजी खासदार धंनजय महाडीक, काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील, हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तसेच उर्वरित प्रवेश दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.

तसेच 5 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर या रोजी भाजपमधे आणखी प्रवेश होणार आहेत. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सत्यजित देशमुख यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. भाजपत जाण्यासाठी अनेक काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांशी संपर्कात आहेत. 05 तारखेला आणखी एकदा दिल्लीत बैठक होईल आणि त्यानंतर प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS