मुंबई – आगामी निवडणुकीत आम्हाला आघाडी करायची असेल तर काँग्रेसशीच करु असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. विरोधी पक्षांकडून काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीदरम्यान शरद पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही कोणत्याही इतर पक्षाशी युती करणार नसून युती करायचीच असेल तर काँग्रेससोबतच करणार असल्याचं पवार म्हणाले आहेत.
दरम्यान आघाडी करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींसोबत दोनदा बोलणी केली असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच आम्ही विदर्भात एक संयुक्त कार्यक्रमही केला होता. जर आम्ही एकत्र आलो तर सत्ताधा-यांना मजबूत पर्याय देऊ शकतो. तसेच शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचंही पवार यांनी त्यावेळी स्वागत स्वागत केलं आहे.
COMMENTS