तुळजापूरचे नगरसेवक नारायण गवळी यांची आत्महत्या

तुळजापूरचे नगरसेवक नारायण गवळी यांची आत्महत्या

तुळजापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नारायण गवळी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारी 12.30 च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तुळजापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान नारायण गवळी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूर येथील महत्वाचे नेते होते. मागील काही वर्षांपासून गवळी यांचं तुळजापूर नगरपालिकेवर वर्चस्व होत. गवळी यांनी तुळजापूर न.प वर नगराध्यक्ष म्हणून ही कार्यभार सांभाळला होता. एका प्रकरणात त्यांना कारागृहात ही जावं लागलं होतं. तुळजापूर येथील महत्वाचे नेते मानले जाणारे यांनी अचानक असा पाऊल घेतल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. आत्महत्येची माहिती कळताच गवळी यांच्या निवासस्थानी स्थानिक नेत्यांची गर्दी झाली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे.

COMMENTS