विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा – उद्धव ठाकरे

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा – उद्धव ठाकरे

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची बैठक आज पार पडली. या बैठकीला राज्यातील शिवसेनेच्या आमदरांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाचे विशेष अधिवशन बोलवण्याची मागणी केली आहे. तसेच अन्य कुठल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्याबाबत संसदेत कार्यवाही झाली पाहिजे. मागासवर्गीय अहवालाची वाट न पाहता मराठा आरक्षण द्या, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. आर्थिक निकषावर आरक्षण द्या पण सध्याचं आरक्षण रद्द करु नका अशी मागणीही उद्धव यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान माझ्या मराठा बांधवांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालचं पाहिजे, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नका असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, त्यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत असं उद्धव यांनी स्पष्ट केले. तसेच मराठा समाजाने आक्रमकता सोडून द्यावी, तसेच कुठेही हिंसाचार करु नये असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

 

COMMENTS