कर्नाटकात एनसीपीचा काँग्रेसला पाठिंबा !

कर्नाटकात एनसीपीचा काँग्रेसला पाठिंबा !

कर्नाटक – कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव डी पी त्रिपाठी यांनी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरश पहायला मिळणार आहे. तसेच भाजपला पराभूत करण्यासाठी आणि मतांमध्ये होणारे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादी निवडणूक लढविणार नसल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली आहे. २२४ जागांच्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात म्हणजेच १२ मे रोजी मतदान होणार आहेत तर १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनता दलाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, एच डी कुमारस्वामी, पीजीआर सिंधिया यांची भेट घेतली होती. कर्नाटक राज्यात राष्ट्रवादीची ताकत मर्यादित असली तरी निवडणूक पूर्ण क्षमतेने लढणार असल्याचे सांगितले होते. परंतु राष्ट्रवादीने थेट निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यात आश्चर्याचा धक्का बसला असून काँग्रेसची ताकद मात्र वाढणार असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS