अहमदनगर – राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या तिस-या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदनगरमधील श्रीगोंदा येथून हल्लाबोल यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्तेत आल्यावर विविध समाजांना आरक्षण देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. सरकारला येऊन साडेतीन वर्षे झाली, अद्याप आरक्षण दिलेले नाही. तसेच कर्जमाफीची घोषणा करताना सरसकट देतो म्हणाले. पण फक्त दीड लाखाची मदत दिली असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली असून मुख्यमंत्री राज्याची फसवणूक करत आहेत. त्यामुळे विश्वासाने सांगतो आज राज्याला अजितदादांच्या नेतृत्वाची गरज असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
सरसंघचालक म्हणतात, देशावर युद्धाची वेळ आली तर संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात तयार होतील. संघाची कार्यपद्धती मला पूर्णपणे माहिती आहे. संघ कसा लढेल हेही माहिती आहे. अरे, महाराष्ट्र कुठे चाललाय? विश्वासाने सांगतो आज राज्याला अजितदादांच्या नेतृत्वाची गरज आहे.- @dhananjay_munde #HallaBol pic.twitter.com/vEbIULr6u5
— NCP (@NCPspeaks) February 15, 2018
दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली असून देशावर युद्धाची वेळ आली तर संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात तयार होतील असे म्हणलतात. संघाची कार्यपद्धती मला पूर्णपणे माहिती आहे. संघ कसा लढेल हेही माहिती आहे. अरे, महाराष्ट्र कुठे चाललाय? त्यामुळे विश्वासाने सांगतो आज राज्याला अजितदादांच्या नेतृत्वाची गरज असल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS