“हल्लाबोल आंदोलनाचा भाजपला धसका, सोशल मीडिया हादरला !”

“हल्लाबोल आंदोलनाचा भाजपला धसका, सोशल मीडिया हादरला !”

लातूर – मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा भाजपनं धसका घेतला असून भाजपचा सोशल मीडिया हादरला असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन शुक्रवारी लातूरमध्ये पोहचलं होतं. यादरम्यान बोलत असताना नवाब मलिक यांनी भाजपनं या आंदोलनाचा धसका घेतला असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मेम्स बनवून बदनामी केली जात असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस जनतेत उतरली असून भाजपला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नसल्याचंही त्यावेळी नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यातील जनतेचं या सरकारनं फसवणूक केली असून आगामी निवडणुकीत भाजपला याचा जोरदार धक्का बसणार असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.

COMMENTS