उस्मानाबाद – उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला अडीच लाख मताधिक्याने निवडून दिले. पण त्याला शेवटचे कधी बघितले हेच लोकांना आठवत नाही नसल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून या यात्रेदरम्यान त्यांनी शिवसेना आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
उस्मानाबादने शिवसेनेच्या उमेदवाराला अडीच लाख मताधिक्याने निवडून दिले. पण त्याला शेवटचे कधी बघितले हेच लोकांना आठवत नाही. #उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तेही लोकांना माहीत नाही. – आ. राणाजगजितसिंह पाटील #हल्लाबोल #भुम pic.twitter.com/iEb1bsJW47
— NCP (@NCPspeaks) January 17, 2018
दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तेही लोकांना माहीत नसल्याची टीका त्यांनी केली असून लोकांनी बटण दाबून ज्यांना निवडून दिले ते किती निष्क्रिय आहेत हे लोकांना आता कळू लागलं आहे. आता अन्याय सहन न करता याविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचंही राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
COMMENTS