हल्लाबोल मोर्चासाठी मराठवाड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जोरदार तयारी

हल्लाबोल मोर्चासाठी मराठवाड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जोरदार तयारी

उस्मानाबाद : सरकारच्या फसव्या धोरणाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यातील तुळजापूर येथून 16 जानेवारीला हल्लाबोल मोर्चा सुरू होत आहे. त्यासाठी मराठवाड्यातील
प्रत्त्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक मेळावे घेतले जात आहेत.

बीडमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकीची फेरी काढण्यात आली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष प्रताप कोते-पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्ते एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यात जावून कोते-पाटील मार्गदर्शक मेळाव्याच्या माध्यमातून युवक कार्यकर्त्यांना हल्लाबोल मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.

उस्मानाबादमध्येही शुक्रवारी युवक राष्ट्रवादीचा मेळावा झाला. खोटे बोलून सत्तेवर आलेल्या सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज जिल्हाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. मराठवाड्यातील युवक राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चासाठी मोठी आघाडी घेतली आहे.

COMMENTS