राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाला कराडमधून सुरूवात !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाला कराडमधून सुरूवात !

कराड – यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाला आज सकाळी सुरूवात झाली. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरूवात झाली. जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी सरकारवर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. सरकारमध्ये रहायचं आणि विरोध पण करायचा अशी दुटप्पी भूमिका शिवसेना सध्या पार पाडत आहे. जनता दुधखुळी नाही. निवडणुकीत त्यांना योग्य तो धडा शिकवेल असंही अजित पवार म्हणाले.

राज्य सरकार पूर्णपणे भरकटले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्र या गावासाठी आलेला निधी परत जाण्याच्या मार्गावर असल्याचं अजित पवार म्हणाले. मुंबईच्या अधिवेशनात घोषणा झालेली कर्जमाफी नागपूरचे अधिवेशन आले तरी अजूनही शेतक-यांना कर्जमाफी मिळालेली नाही असा आरोपही अजित पवार यांनी केला. शेतमालाला भाव द्याचं सोडून द्या, सरकार शेतक-यांवर गोळीबार करत आहे असंही पवार म्हणाले. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन सुरू केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

COMMENTS