गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेचे कंधाल जाडेजा विजयी

गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेचे कंधाल जाडेजा विजयी

गुजरात – गुजरात निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत भाजप सध्या आघाडीवर असल्याचं पहावयास मिळत आहे. काही ठिकाणचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसनं गुजरातमध्ये एक खातं खोललं आहे. राष्ट्रवादीचा एका जागेवर विजय झाला  असून कुटियाणामधून कंधाल जाडेजा हे विजयी झाले आहेत. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या होत्या.

गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 182 जागांवर उमेदवार उतरवले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2007 आणि 2012 ची गुजरात विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करुन लढवली होती. दोन्ही पक्षातील तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त जागा मागितल्याचा आरोप काँग्रेसने केला.

COMMENTS