औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर पेच,…तर माझा विचार व्हावा, धारूरचे तालुकाध्यक्ष ईश्वर मुंडे मैदानात!

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर पेच,…तर माझा विचार व्हावा, धारूरचे तालुकाध्यक्ष ईश्वर मुंडे मैदानात!

बीड (किल्लेधारुर) – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगात येत असून एकूण दाखल ५३ उमेदवारी अर्जांपैकी छानणीमध्ये ४५ उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत. असून ८ उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत. यामध्ये भाजप व महाविकास अघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धारूर तालुकाध्यक्ष प्रा. ईश्वर मुंडे यांचा अर्ज वैध ठरल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

सतीश चव्हाण

प्रा. ईश्वर मुंडे यांनी जिल्हा परिषद बीड अंतर्गत प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर २० वर्षे सेवा केलेली असल्याने त्या दरम्यान विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा यामुळे त्यांचा मराठवाडाभर चांगला जनसंपर्क आहे. तसेच ते ईश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक असून त्याअंतर्गत शाळा, कॉलेज व बालगृह चालू असल्याने मराठवाडयातील संस्थाचालक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व पालकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. साने गुरुजी सार्वजनीक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे मराठवाडयातील ग्रंथालय चालक व कर्मचारी यांच्याशीही त्यांचा चांगला संपर्क आहे.

एकंदर मराठवाडयातील सर्व जिल्हयात दांडगा जनसंपर्क व मोठयाप्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी केलेल्या प्रा.ईश्वर मुंडे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व उमेदवाराला गांभीर्याने घ्यावे लागेल हे तितकेच खरे आहे. कारण आपण ज्या पक्षासाठी,नेत्यांसाठी तन मन धनाने जीव ओतून काम करतो त्यांच्या कडे उमेदवारीचा हट्ट धरणे किंवा निवडणूक अर्ज दाखल करणे म्हणजे बंडखोरी नव्हे तर केलेल्या कामाचा न्याय मागणे आहे. जर भाजपने पसंती क्रमांक दोनचा उमेदवार घोषीत केला तर महाविकास आघाडीकडून माझा विचार व्हावा. अशी मागणी
प्रा.ईश्वर मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार दि. १७ / ११ / २०२० पर्यंतचा अवधी असल्याने निवडणुकीचे खरे चित्र पाहण्यासाठी थोडी करावी लागणार आहे. त्यामुळे प्रा.ईश्वर मुंडे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का नाही याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS