राष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीची घोषणा, अध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती !

राष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीची घोषणा, अध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचीही जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर आता   राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनामा समितीची घोषणा केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची निवड केली आहे. या समितीमध्ये एकूण २२ सदस्यांची निवड करण्यात आली असून या सदस्यांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली आहे.

समितीतील सदस्यांची नावे

आमदार भास्कर जाधव, अण्णा डांगे, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, खासदार वंदना चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.विक्रम काळे, राष्ट्रवादी विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, भूषण राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS