मुंबई – भाजप-शिवसेना सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. दिल्लीमध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही हे माहित नाही. पण भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची पत जनतेच्या मनातून उतरली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नाणारवरुन शिवसेना आणि भाजपा कोकणवासीयांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.नाणार भूसंपादनासंदर्भात १८ मे २०१७ ची अधिसूचना रद्द करण्याची सुभाष देसाई यांची घोषणा म्हणजे फार्स असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याबाबत सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का असा सवालही मुंडे यांनी केला आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निर्णय झाला आहे का ? हा प्रकल्प नाणारमध्ये येणार हे माहीत असतांना आजपर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले ?, असे सवालही धनंजय मुंडे यांनी केले आहेत.
COMMENTS