“उद्धवजी तुम्ही नाणारच्या तहात किती घेणार ?”

“उद्धवजी तुम्ही नाणारच्या तहात किती घेणार ?”

मुंबई –  रत्नागिरीतील नाणार प्रकल्पावरुन राज्यात चांगलंच वातावरण तापत असल्याचं पहावयास मिळत आहे. यावरुन पुन्हा एकदा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकेर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज उद्धव ठाकरे म्हणाले की, “नाणार नाही देणार”, मग उद्धवजी, तुम्ही नाणारच्या तहात किती घेणार? उद्धवजी म्हणाले, मावळे विकले जात नाहीत.. खरंय… मावळे विकले जात नाहीत. पण दुर्दैव हे आहे की,  आजचे स्वयंघोषित सेनापती विकले जातात. अशी जोरदार टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान तुम्ही मोदींना व्हीलन म्हणता, मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्चर सुरू आहे, त्यात तुमची भूमिका काय आहे? ते सुद्धा एकदा स्पष्ट करा. हिंमत असेल तर या मुद्यावर सत्तेतून बाहेर पडा, नाही तर तुम्ही साइड व्हीलन आहात, ते तरी मान्य करा. मुख्यमंत्र्यांना कवडीचीही किंमत नसल्याचे तुम्ही सांगता. मग अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री काम कसे करतात. सरकारमधून बाहेर पडण्याच्या तुमच्या इशाऱ्यांची आता डबल सेन्चुरी होत आली आहे. त्यामुळे लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा बंद करा असा इशाराही विखे पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS