मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या फळीतील एक नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या नेत्याचं नाव अजून समजलं नसून त्यांनी खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे विजयसिंह मोहीते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहीते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर निवडणुकांच्या प्रचारावेळी मोहीते पाटलांनी उघडपणेच भाजपचा प्रचार केला आणि मुख्यमंत्र्यांनीही मोहीते पाटील मनाने भाजपत असल्याचेच जाहीर केले होते. मोहीते पाटील शरद पवार यांच्या वाद अखेर विकोपाला गेला आणि अखेर मोहीतेसिंह पाटील राष्ट्रवादीतूवन बाहेर पडल्याचेच चित्र दिसत आहे. अशातच आता
विजयसिंह मोहीते पाटील यांची आणखी एक नेता भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
COMMENTS