राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, ‘या’ महिला नेत्या 30 जुलैला जाणार भाजपात ?

राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, ‘या’ महिला नेत्या 30 जुलैला जाणार भाजपात ?

मुंबई – आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. कालच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि आमदार वैभव पिचड 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच चित्रा वाघ आणि वैभव पिचड यांनी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान चित्रा वाघ, वैभव पिचड यांच्याबरोबरच कालिदास कोळंबकर यांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या सर्वांच्या प्रवेशासाठी यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी मध्यस्थी केल्याचेही बोललं जात आहे. तसेच जयकुमार गोरे, सुनील केदारे, गोपालदास अग्रवाल ही भजप प्रवेशाच्या रांगेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS