काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघात राष्ट्रवादीची जोरदार तयारी, शरद पवारांनीही दर्शवली अनुकूलता ?

काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघात राष्ट्रवादीची जोरदार तयारी, शरद पवारांनीही दर्शवली अनुकूलता ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं जोरदार कंबर कसली असल्याचं दिसत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मतदारसंघाची अदलाबदली करण्याची मागणीही केली जात आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसला यश आलं नाही त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दावा केला जात आहे. औरंगाबाद मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

परंतु याठिकाणमी काँग्रेसला अजूनपर्यंत यश आलं नसल्यामुळे या मतदारसंघाची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जात आहे.याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विविध कामांच्या माध्यमातून कंबर कसली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान औरंगाबाद मतदारसंघात काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे. म्हणूनच ही जागा या वेळी राष्ट्रवादीला सोडण्याची आग्रही मागणी कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष नेते शरद पवार यांनीही चव्हाण यांनाच अनुकूलता दर्शविलेली असल्याची माहिती आहे. त्यामुळे चव्हाण हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागले आहेत. परंतु हा मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीला सोडणार का ? हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS