राष्ट्रवादीचे पाऊल पडते पुढे, ‘या’ राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार!

राष्ट्रवादीचे पाऊल पडते पुढे, ‘या’ राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार!

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पाऊल पुढे पडत असल्याचं दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं महाराष्ट्रासोबतच आणखी एका राज्यात निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 26 जागा लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली आहे. च्यामुळे महाराष्ट्रानंतर आता राष्ट्रवादीचं घड्याळ गुजरातमध्ये देखील दिसणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला याठिकाणी बळकटी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी केली असली तरी गुजरातमध्ये मात्र त्यांनी वेगवेगळं लढणं पसंत केलं आहे. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये सर्व म्हणजेच 26 जागा जिंकणाय्रा भाजपला याठिकाणी राष्ट्रवादी आव्हान देणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS