लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठणार, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार ?

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठणार, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. परंतु या निकालापूर्वी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय जाणकारांच्या मते महाराष्ट्रात भाजप पक्ष सर्वाधिक जागा जिंकत पहिल्या स्थानावर येण्याची शक्यता आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकेल. विदर्भ व मुंबईत अपेक्षित यश मिळाले तर काँग्रेसही दोन जागांवरून दोन आकडी जागा गाठू शकते आणि तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकते, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून वर्तवला जात आहे.

दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका सहन करावा लागणार असल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे गड मानले जाणाऱ्या औरंगाबाद , परभणीत वर्षानुवर्षे तेच ते चेहरे व न झाल्या कामांमुळे जनतेत राेष आहे. त्यामुळे या मतदारसंघांतही शिवसेनेला धक्का बसण्याची चिन्हे आहेत . दुसरीकडे या भागात वंचित बहुजन आघाडीचा मात्र काँग्रेसला फटका बसू शकताे.

२०१४ मध्ये काँग्रेसने राज्यात दाेनच जागा राखडलेल्या नांदेड व हिंगाेलीत ‘वंचित’चे उमेदवार चालल्याने अशाेक चव्हाणांची दमछाक झाली. येथील निकालही धक्कादायक लागू शकतात असा अंदाज आहे. २०१४ मध्ये १० पैकी १० जागा जिंकणाऱ्या भाजप- शिवसेना युतीला विदर्भात यंदा किमान चार ते पाच जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे . तसेच राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील मतदारांनी ‘पंजा’ला पसंती दिल्याचे अंदाज आहे.

COMMENTS