राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार फडणवीसांसोबत

राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार फडणवीसांसोबत

औरंगाबाद : विधान परिषदेच्या नुकत्यात झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप यांच्या जोरदार लढत झाली. यात भाजपच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपला एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. पण शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत औरंगाबाद मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सतिश चव्हाण यांनी विमान प्रवास केल्याचा फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये विधानपरिषदेच्या चार जागांवर महाविकासआघाडीने घवघवीत यश मिळवले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण हे तिसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा ५७ हजार ८९५ मतांनी पराभव केला.

देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाणही त्याच विमानात होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सतीश चव्हाण यांनी एकाच सीटवरून हा प्रवास केला. हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने उलट-सुटल चर्चा सुरू झाली आहे.

 

COMMENTS