राणाजगजितसिंह पाटलांनी राष्ट्रवादीचा आणि सत्तेचा वापर हुकूमशाहीचे पद्धतीने केला – आमदार विक्रम काळे

राणाजगजितसिंह पाटलांनी राष्ट्रवादीचा आणि सत्तेचा वापर हुकूमशाहीचे पद्धतीने केला – आमदार विक्रम काळे

उस्मानाबाद – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पडझड थांबण्यासाठी आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राहुल मोठे यांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषदेत पाटील पिता पुत्रावर हल्लाबोल केलाय. आमदार काळे यांनी पाटील पितापुत्रांच्या हुकूमशाही पद्धतीला येथील जनता कंटाळली होती. त्यांनी सत्तेचा वापर हुकूमशाही प्रमाणे केला आणि पक्षाचे नुकसान केले. असा हल्लाबोल करीत पुढील काळात राष्ट्रवादी जोमाने वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तर आमदार पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादीची किरकोळ हाणी होईल अशा शब्दात जीवनराव गोरे यांनी आमदार पाटील पिता पुत्राची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा संघर्ष यापुढे चांगलाच पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. शिवाय नवीन कार्यकारणीमध्ये कोणाला संधी मिळते, युवकांना मिळते की पुन्हा एकदा नातेवाईकांनाच संधी दिली जाते. याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

COMMENTS