राष्ट्रवादीच्या आमदाराची अभियंत्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

राष्ट्रवादीच्या आमदाराची अभियंत्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

जिंतूर – 14 व्या वित्त आयोगातील कामाचे बिल काढण्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांनी अभियंत्याला केलेली शिवीगाळ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जिंतुर पंचायत समितीचे अभियंते अरविंद कांबळे यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील कसर येथे 14 व्या वित्त आयोगातून आमदार विजय भांबळे यांच्या कार्यकर्त्यांने काम केल्याचा आमदारांचं म्हणणं आहे, तर कामच पूर्ण झालं नसेल तर बिल कसे काढू असे जिंतुर पंचायत समितीचे अभियंता अरविंद कांबळे यांचं म्हणणं आहे.

माझ्या कार्यकर्त्याचं तू कामच करत नाहीस, त्यांचं काम करून दे, पण कामच झालं नाही तर बिल कसं देऊ असं अभियंता कांबळे यांनी उत्तर दिलं असता अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तुझं दुकान लाऊ का? अशी धमकी आमदारांनी दिली. सदर ध्वनीफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.अभियंते अरविंद कांबळे यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात 507 प्रमाणे आमदार विजय भांबळे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे अधिकारी वर्गात घबराट निर्माण झालीये.

 

 

COMMENTS