राष्ट्रवादीला मोठा धक्का, विद्यमान खासदार भाजपच्या वाटेवर?, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट!

राष्ट्रवादीला मोठा धक्का, विद्यमान खासदार भाजपच्या वाटेवर?, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले हे दोखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. उदयनराजे यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर राज्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच उदयनराजेंचे बंधू आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता उदयनराजे देखील भाजपात जाणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजेंनी दाखवली असल्याची माहिती आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक, सचिन अहिर, चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता उदयनराजेही लवकरच भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS