लोकसभेसाठी राष्ट्रवादीत बदलाचे वारे, या नवीन चेह-यांना मिळणार संधी ?

लोकसभेसाठी राष्ट्रवादीत बदलाचे वारे, या नवीन चेह-यांना मिळणार संधी ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत . त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. तसेच ही चुरशीची निवडणूक जिंकायची असेल तर समोर तगडा उमेदवार उभं करणं हे पक्षाचं मोठं काम असणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून सध्या उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही याबाबत चाचपणी केली जात असून या निवडणुकीसाठी नवीन उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान रावेर, नंदूरबार, पुणे, भंडारा-गोंदिया या चार मतदारसंघांचा जागावाटपावेळी अदलाबदल करण्याचा विचार राष्ट्रवादीच्या मनात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या या  जागा वाटपांचा फॉर्म्युला निश्‍चित झाला नाही. परंतु आपल्याकडील रावेर व भंडारा-गोंदिया मतदारसंघ काँग्रेसला द्यावेत व  त्याबदल्यात काँग्रेसकडील नंदूरबार व पुणे आपण घ्यावेत अशी चर्चा  राष्ट्रवादीमध्ये  सुरु असल्याची माहिती आहे.

तसेच अमरावती लोकसभेची उमेदवारी संजय खोडके यांना दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर राजीव राजळे यांच्या निधनामुळे अहमदनगरमध्ये उमेदवार बदलले जाणार आहेत. तसेच पुण्यातील लक्ष्मण जगताप (मावळ), कृष्णराव इंगळे (बुलडाणा), विजय भांबळे (परभणी) यांच्या जागी नवीन चेह-याला संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा पक्षात सुरु आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित झाल्यानंतरच कोणाला कुठे उमेदवारी देण्यात आली हे समजणार आहे.

 

COMMENTS