9 जानेवारीपासून राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा – जयंत पाटील VIDEO

9 जानेवारीपासून राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा – जयंत पाटील VIDEO

मुंबई – ९ जानेवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यभर परिवर्तन यात्रा काढणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. सामान्यांचा भ्रमनिरास करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारविरोधात जनजागृती करण्यासाठीच ही यात्रा काढण्यात येणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान निर्धार परिवर्तनाचा ही भूमिका घेऊन आम्ही ही यात्रा काढत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. महाडच्या चवदार तळ्याच्या परिसरात या यात्रेची पहिली सभा पार पडणार असून या यात्रेदरम्यान केंद्र व राज्य सरकारचं अपयश आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. तसेच भाजप -शिवसेनेच्या विरोधात ही यात्रा काढणार असून सरकारनं ज्यांची फसवणूक केली त्यांच्यासमोर आमची भूमिका मांडणार असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS