राष्ट्रवादीला मोठा धक्का, प्रकाश आण्णा शेंडगेंचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा !

राष्ट्रवादीला मोठा धक्का, प्रकाश आण्णा शेंडगेंचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे.  ज्येष्ठ नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा व राष्ट्रवादी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रकाश आण्णा शेंडगे यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाने पत्र लिहिलं असून यामध्ये त्यांनी आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्र व केंद्रात भाजप-सेनेचे सरकार आल्यानंतर मागास प्रवर्गाच्या जातीव अन्याय झाला आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे ओ.बी.सी., व्ही. जे. एनटी, एस.बी.सी., व धनगर या समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे. या आरक्षणाच्या संरक्षणासाठी माझ्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरु आहे. कोणत्याही पक्षाच्या चौकटीत राहून मला या मागास समुहाला न्याय देणं अशक्य होत असल्यामुळे तसेच विविध संघटनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व माझ्यावर सोपविले असल्यामुळे मी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा देत असल्याचं प्रकाश आण्णा शेंडगे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रकाश आण्णा शेंडगे राजीनामा दिल्यानंतर धनगर समाजाचे नेते डॉ. शिवाजी दळणर यांनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या असून या आंदोलनात राज्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे असं आवाहनही शिवाजी दळणर यांनी केलं आहे.

COMMENTS