नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जोरदार धक्का बसला असून पक्षाचे संस्थापक सदस्य सरचिटणीस तारिक अन्वर यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत तारिक अन्वर यांचा मोठा वाटा आहे. पक्ष नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यानंतर शरद पवारांबरोबर काँग्रेस सोडलेल्या मोजक्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
NCP national general secretary Tariq Anwar quits the party, also resigns from the post of Lok Sabha MP. (File pic) pic.twitter.com/vX4ablr9fL
— ANI (@ANI) September 28, 2018
दरम्यान राफेल विमान व्यवहारप्रकरणी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेतल्याने ते नाराज झाले होते अशी माहिती आहे. त्यामुळे अन्वर यांनी अचानक राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. उत्तर भारतातील राष्ट्रवादीचा ते प्रमुख चेहरा होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात शरद पवार, दिवंगत नेते पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांची भूमिका महत्वाची होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठा धक्का आहे.
COMMENTS