“पवार साहेबांबद्दल असे विधान करायची खरच मला गरज नव्हती, मनापासून क्षमा मागतो ! “

“पवार साहेबांबद्दल असे विधान करायची खरच मला गरज नव्हती, मनापासून क्षमा मागतो ! “

मुंबई – शरद पवार साहेबांबद्दल असे विधान करायची खरच मला गरज नव्हती तरी माझ्या हातून ही आगळीक घडली प्लीज समजून घ्या,’ मनापासून तुम्हा सर्वांची क्षमा मागतो, अशी फेसबुकवर पोस्ट करत प्रसिद्ध चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनी फेसबुकवरुन माफी मागितली आहे. गोखले यांनी पवारांबद्द्लच्या एका बातमीवर एक वादग्रस्त कमेंट केली होती.

भाजपाचा अनपेक्षित मतदारसंघात विजय झाल्यास लोकांचा निवडणूकीवरील विश्वास उडेल असे मत शरद पवार यांनी मांडलं होतं. त्यावर गोखले यांनी एक वादग्रस्त कमेंट केली होती. या कमेंटवर अनेकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांनी फेसबुकवरुन माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान ‘बारामती जिंकण्याच्या भाजपाच्या दाव्यानंतर शरद पवारांच धक्कादायक विधान’ असा मथळा असणाऱ्या बातमीवर गोखले यांनी खोचक कमेंट केली होती. ‘मी वाचलं धक्कादायक निधन. देव त्यांच्या आत्म्याला सॉरी सॉरी देव त्यांना उदंड आयुष्य देवो’ असे या कमेंटमध्ये गोखलेंनी म्हटले होते.

गोखले यांच्या या कमेंटचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या कमेंटखाली गोखलेंवर टीका केली होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर गोखले यांनी माफी मागितली नाही तर त्यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारीच दिला होता. यानंतर अखेर गोखलेंनी माफी मागितली होती.

COMMENTS