बारामतीत राष्ट्रवादीचं यल्गार आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी !

बारामतीत राष्ट्रवादीचं यल्गार आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी !

पुणे – पेट्रोल-डीझेलचे दर, तसेच महागाई कमी करावी, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शासनानं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी आज बारामतीत राष्ट्रवादीच्यावतीनं यल्गार आंदोलन करण्यात आलं. हातगाड्यावर दुचाकी आणि सिलेंडर ठेवत, तसेच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे घालून कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान राज्यात सध्या महागाईने अक्षरशः सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मात्र शासन याकडे लक्ष देत नाही. तसेच पावसानं हुलकावणी दिल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं शासनानं दुष्काळ जाहीर करण्यासह वाढती महागाई रोखावी अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर  यांनी केली आहे.

तसेच आज अकोल्यातही महागाई आणि सरकारच्या विविध धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रोश मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

COMMENTS