भारत बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा

भारत बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मुंबई – पंजाब चे शेतकरी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून शेतकरी बांधव दिल्लीच्या आसपास ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनात देशभरातील राजकिय पक्षांनी पाठिंबा दिला देण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. तसेच कृषी कायद्यांविरुद्ध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर रोजीच्या ‘ भारत बंद ‘ला राष्ट्रवादी काँग्रेसने आज पाठिंबा जाहीर केला आहे.
रविवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “सर्वात जास्त शेती आणि देशातील नागरिकांना होणाऱ्या अन्नपुरवठ्याबाबत विचार केला तर सर्वात जास्त योगदान पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं आहे. गहू आणि तांदूळ उत्पादनात हे राज्य देशाची तर गरज भागवतातच, यासोबत आणखीन १७ ते १८ देशांना पुरवायचं काम हा देश करतोय ज्यामध्ये पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी जेंव्हा रस्त्यावर उतरतो तेंव्हा त्याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला हवी.”
पुढे बोलताना पवार म्हणाले आहेत की, “केंद्राने मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे असं दिसत नाही. असंच जर राहिलं तर हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही आणि देशातील कानाकोपऱ्यातील लोकं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे सरकारने अजूनही शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे”.

 

COMMENTS