राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना अटक, पोलिसांबद्दलचे अपशब्द पडले महागात !

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना अटक, पोलिसांबद्दलचे अपशब्द पडले महागात !

बीड – राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांना पोलिसांनी अटक केली आहे. केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. आपल्या नेत्यांसमोर ओघाच्या भरात बोलणे फड यांना चांगलेच महागात पडले असून शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी रविवारी अटक केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत त्यांनी पोलीस निरक्षकाविरोधात त्यांनी अपशब्द वापरले होते. भाषणादरम्यान बोलत असताना त्यांनी गुन्ह्यांचा तपास लावत नसल्याने आपण पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना वारंवार धमक्या दिल्या आहेत. तसेच केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे विकाऊ असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांना हे वक्तव्य महागात पडलं असून पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

 

COMMENTS