सातारा – माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उघड झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा केला. माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला आहे.
दरम्यान कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर गोरे यांनी स्टेजवर न जाण्याचा निर्णय घेत खाली बसले. सर्वांनी त्यांना स्टेजवर येण्यासाठी विनंती केली, मात्र ते स्टेजवर न जाता खालीच बसले. यानंतर कविता म्हेत्रे यांनी भाषणाला सुरुवात करताच, शेखर गोरे यांच्या समर्थकांनी ‘सर्व सांगा, खरं सांगा’, असं म्हणत गोंधळ घातला.
यावेळी खुद्द शरद पवारांनीही पुढाकार घेतला परंतु कार्यकर्ते ऐकत नव्हते. त्यामुळे पवार हताशपणे हा वाद पाहत राहिले.कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
COMMENTS