नवी मुंबई – बहुचर्चित आणि मुंबई विमानतळाचा भार कमी करू शकणा-या नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन अखेर 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सध्या विमानतळाच्या मुख्य गाभ्याचे प्राथमिक काम सुरु असून उलवेच्या डोंगरची उंची कमी केली जात आहे, तसंच विमानतळच्या इतर भागाच्या सपाटिकरणाचे काम जोरात सुरु आहे. पुढील 5 – 6 महिन्यात प्रत्यक्ष विमानतळाच्या कामाला सुरुवात होणार आहे. विमानतळ बनवण्याचे काम GVK कंपनीला याआधीच देण्यात आले आहे.
हे विमानतळ सुमारे 2300 हेक्टर जागेवर उभारलं जाणार असून यामध्ये दोन समांतर धावपट्टया असणार आहेत. या विमानतळचा पहिला टप्पा 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवी मुंबई विमानतळामुळे सध्याच्या मुंबई विमानतळावरचा मोठा भार हलका होणार आहे.
COMMENTS