सातारा लोकसभेत उदयनराजेंविरोधात लढणार का ‘ते’ भोसले ?

सातारा लोकसभेत उदयनराजेंविरोधात लढणार का ‘ते’ भोसले ?

सातारा – सातारा लोकसभेत उदयनराजेंविरोधात कराडचे युवा नेते आणि महाराष्ट्र भाजपचे चिटणीस अतुल भोसले हे उदयनराजे भोसले यांच्याविरोधात पुढील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असल्याचं दिसत आहे. कारण याबाबत स्वतः अतुल भोसले यांनी पत्रक काढून आपल्याविरुद्ध विरोधकांनी हेतूपुरस्सर लोकसभेच्या उमेदवारीविषयी बातम्या दिल्या असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असं म्हटलं आहे.

गेली काही दिवसांपासून अतुल भोसले हे सातारा लोकसभा निवडणूक २०१८ लढवणार असल्याच्या चर्चाँना उधाण आलं होतं.परंतु आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कराड दक्षिण’ या विधानसभा मतदार संघातच विकासकामांचा धडाका लावला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत ते उदयनराजेंविरोधात लढणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

अतुल भोसले यांची ओळख

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष

भाजप कराडचं युवा नेतृत्व म्हणून ओळख

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे भाऊ आणि आमदार दिलीप देशमुख यांचे जावई

पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच दरारा

काँग्रेसचे एकेकाळचे मातब्बर नेते यशवंतराव मोहिते यांचे नातू

 

COMMENTS