नवी मुंबईत राष्ट्रवादीला धक्का ?

नवी मुंबईत राष्ट्रवादीला धक्का ?

नवी मुंबई – आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण नवी मुंबईत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. तसेच आमदार संदीप नाईकांच्या बॅनरवरून सुतारांना गायब करण्यात आल्याचं पहावयास मिळालं आहे. 13 वर्षानंतर अचानक फोटो न लावल्याने सुतार नाराज असल्याची माहिती असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षात फाटफुटीचं राजकारण सुरु असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सुतार यांची नाराजी दूर झाली नाही तर ते लवकर पक्ष सोडतील असं बोललं जात आहे. सुतार यांनी राजीनामा दिला तर निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS