वाराणसी ऐवजी पंतप्रधान मोदी ‘या’ ठिकाणाहून लढवणार निवडणूक ?

वाराणसी ऐवजी पंतप्रधान मोदी ‘या’ ठिकाणाहून लढवणार निवडणूक ?

ओडिसा  आगामी लोकसभा निवडणूक वाराणसी ऐवजी दुस-या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याची माहिती आहे. वाराणसी ऐवजी मोदी हे यावेळेस ओडिसामधून निवडणूक लढू शकतात असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रदीप पुरोहित यांनी केला आहे. ओडिसाच्या पुरी शहरातून पंतप्रधान मोदी निवडणुका लढण्याच्या 90 टक्के शक्यता असल्याचं त्यांनी पुरोहित यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी हे गेल्यावेळेस वाराणसी आणि वडोदरा या दोन ठिकाणांहून निवडणूक लढले होते. ते यावर्षी कुठून निवडणूक लढणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. तसेच ते आगामी निवडणूक वाराणसी येथून लढणार असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं होतं. परंतु पुरोहित यांनी मात्र ते ओडिसामधून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिसाच्या लोकांवर खूप प्रेम करतात आणि पुरी शहर हे त्यांच्या जिव्हाळ्याचं आहे. त्यामुळे ते पुरीमधून निवडणुका लढतील’ असं प्रदीप पुरोहित यांनी म्हटलं आहे.

COMMENTS